जगातील सर्वाधिक अपयशी देशांची यादी समोर आली असून यामध्ये पाकिस्तानचा समावेश टॉप 20 मध्ये झाला आहे. फ्रॅजाइल स्टेट्स इंडेक्सतर्फे प्रसिद्ध झालेल्या अहवालात पाकिस्तानला अपयशी देश म्हणून संबोधले आहे. पाकिस्ताचा या यादीत 18 वा क्रमांक असून, त्यामुळे पाकिस्तानचे खरे रूप पुन्हा जगासमोर आले आहे. पाकिस्तानला सातत्यानं पाठीशी घालणा-या चीनमधील ब्रिक्स देशांच्या बैठकीतही एक संयुक्त घोषणापत्र प्रसिद्ध करण्यात आले. यात पाकिस्तानाने किती दहशतवादी संघटनांना आश्रय दिला याची आकडेवारीसह नावे प्रसिद्ध करण्यात आली होती.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews